केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) ( Examination Notice No. ०६ / २०२३- IFoS. ‘ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन २०२३ ‘ साठी जे उमेदवार अर्ज करू इच्छितात त्यांना सिव्हील सर्व्हिसेस ( प्रीलिमिनरी ) एक्झामिनेशन, २०२३ द्यावी लागेल . यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ( मुख्य ) परीक्षेसाठी निवडले जाईल . एकूण रिक्त पदे १५०.
पात्रता : पुढीलपैकी एका विषयासह पदवी परीक्षा उत्तीर्ण ( अँनिमल हजबंडरी अँण्ड वेटेनिअरी सायन्स , बॉटनी , केमिस्ट्री , फिजिक्स , जीओलॉजी , झूऑलॉजी , मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स ) किंवा अँग्रिकल्चर , फोरेस्ट्री किंवा इंजिनिअरींग पदवी उत्तीर्ण पदवीच्या अंतिम वर्षांचे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत . ( पदवीचा निकाल इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ( मुख्य ) परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी लागणे आवश्यक , ही परीक्षा जुलै , २०२३ मध्ये जाहीर होईल.)
वयोमर्यादा : दि . १ ऑगस्ट २०२३ रोजी २१ ते ३२ वर्षे . ( इमाव – ३५ वर्षेपर्यंत , अजा / अज – ३७ वर्षेपर्यंत ) शारीरिक मापदंड : पुरुष- उंची १६३ सें.मी. , छाती – ७ ९ ते ८४ सें.मी. महिला – उंची १५० सें.मी. छाती – ७४-७९ सें.मी. निवड पद्धती : ( १ ) सिव्हील सर्व्हिसेस ( पूर्व ) परीक्षा जी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल . ( २ ) इंडियन फॉरेस्ट सविहंस ( मुख्य ) परीक्षा ( लेखी परीक्षा व सिव्हील सर्व्हिसेस ( पूर्व ) परीक्षा दि . २८ मे २०२३ रोजी घेतली जाणार आहे . ऑक्टाई – दोन पेपर , प्रत्येकी २०० गुणांसाठी . ( १ ) जनरल स्टडीज पेपर – १-२०० गुणांसाठी वेळ २ तास ( २ ) जनरल स्टडीज पेपर – २-२०० गुणांसाठी वेळ २ तास. ( पात्र ठरण्यासाठी किमान ३३ टक्के गुण आवश्यक.) प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या ३३ टक्के गुण वजा केले जातील. दोन्ही पेपरांतील प्रश्न हिंदी / इंग्रजी भाषेत असतील. पूर्व परीक्षेतील गुण अंतिम निवडीसाठी विचारात घेतले जात नाहीत. जनरल स्टडीज पेपर -१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार इंडियन फरिस्ट सव्हिंस ( मुख्य ) परीक्षेसाठी निवडले जातील. साधारणत रिक्त पदांच्या १२ ते १३ पट उमेदवार निवडले जातील.
पूर्व परीक्षेसाठी केंद्र : मुंबई, नागपूर, नवी मुंबई , ठाणे, औरंगाबाद, नाशिक, पुणे, पणजी, : मुख्य परीक्षा नोव्हेंबर, २०२३ मध्ये घेतली जाईल. मुख्य परीक्षेसाठी केंद्र नागपूर, भोपाळ, हैदराबाद इ. (अ ) लेखी परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असेल. पेपर १- जनरल इंग्लिश ३०० गुण, पेपर -२ जनरल नॉलेज ३०० गुण, ऑप्शनल सब्जेक्ट्सच्या लिस्टमधून उमेदवारांना दोन विषय निवडावे लागतील. ( १ ) अग्रिकल्चर, ( २ ) अग्रिकल्चरल इंजिनिअरींग, ( ३ ) अँनिमल हजबंडरी अँण्ड वेटनिअरी सायन्स, ( ४ ) बॉटनी, ( ५ ) केमिस्ट्री, ( ६ ) केमिकल इंजिनिअरींग, ( ७ ) सिव्हील इंजिनिअरींग ( ८ ) फॉरस्ट्री , ( ९ ) जीओलॉजी , ( १० ) मॅथेमॅटिक्स, ( ११ ) मेकॅनिकल इंजिनिअरींग, ( १२ ) फिजिक्स , ( १३ ) स्टॅटिस्टिक्स , ( १४ ) झूओलॉजी ) उमेदवारांना पुढील विषय एकत्रपणे निवडता येणार नाही – ( १ ) केमिस्ट्री , केमिकल इंजिनिअरींग : ( २ ) अँग्रिकल्चर, अँग्रिकल्चरल इंजिनिअरींग ; ( ३ ) अँग्रिकल्चर , ॲनिमल हजबंडरी अँण्ड वेटेनिअरी सायन्स ; ( ४ ) अँग्रिकल्चर , फॉरेस्ट्री , ( ५ ) मॅथेमॅटिक्स , स्टॅटिस्टिक्स ( ६ ) कोणतेही २ इंजिनिअरींग विषय . प्रत्येक विषयासाठी दोन पेपर प्रत्येकी २०० गुणांसाठी असतील मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स इंग्रजी भाषेत असतील. प्रत्येक पेपरला ३ तासांचा वेळ दिला जाईल ( ब ) पसनॅलिटी टेस्ट- एकूण ३०० गुणांसाठी असेल. पर्मोनलिटी टेस्टसाठी रिक्त पदांच्या दुप्पट उमेदवार निवडले जातील शारीरिक क्षमता चाचणी पात्रता स्वरूपाची असेल पुरुषांनी २५ कि.मी. अंतर आणि महिला उमेदवारांनी १४ कि.मी. अंतर ४ तासाच्या कालावधीत पूर्ण करणे
अजांचे शुल्क : रु . १०० / – ( अजा / महिला/दिव्यांग यांना फी माफ आहे.) पात्र असल्यास उमेदवार सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन या दोन्ही परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज भरताना तसे नमूद करू शकतात. पूर्व परीक्षा पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशनसाठीच्या वेगवेगळ्या होणाऱ्या मुख्य परीक्षांसाठी अर्ज भरावे लागतील ऑनलाइन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर दि . २१ फेब्रुवारी २०२३ ( १८.०० वाजेपर्यंत करता येतील . अर्जासोबत वय शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठीचे दाखले अपलोड करावयाचे नाहीत . E – admit Card https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील . शंकासमाधानासाठी फोन नं . ०११ २३३८११२५ / २३३८५२७१ / २३० ९ ८५४३ . ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर काही बदल करावयाचे असल्यास One Time Registration ( OTR ) प्लॅटफॉर्मवर लॉगइन करून ‘ Window for Modification in Application For ‘ मधून दि . २२ ते २८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान करता येतील ऑनलाइन अर्ज मागे घेण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली नाही .