सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (गृह मंत्रालय, भारत सरकार)४५१ पदांवर पुरुष उमेदवारांची थेट भरती.

February 16, 2023

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) (गृह मंत्रालय, भारत सरकार) कॉस्टेबल / ड्रायव्हर आणि कांस्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर (Driver for Fire Services) च्या एकूण ४५१ पदांवर पुरुष उमेदवारांची थेट भरती.

(१) कॉस्टेबल / ड्रायव्हर : एकूण १८३ पदे (अजा-२७, अज- १३, इमाव- ४९, ईडब्ल्यूएस- १८, खुला – ७६) (१८ पदेमाजी सैनिकांसाठी राखीव).

(२) कॉस्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर (म्हणजेच फायर सर्व्हिसेससाठी ड्रायव्हर) – एकूण २६८ पदे (अजा- ४०, अज १९, इमाव- ७२, ईडब्ल्यूएस- २६. खुला १११) (२७ पदे माजी सैनिकांसाठी -राखीव):

पात्रता : १० वी उत्तीर्ण आणि HMV/ TV, LMV, गिअरसह असलेली मोटर सायकल चालविण्याचा परवाना.

अनुभव: (दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी) अवजड वाहन किंवा ट्रान्सपोर्ट वेहिकल किंवा हलके वाहन आणि मोटर सायकल चालविण्याचा तीन वर्षांचा अनुभव.

शारीरिक मापदंड: उंची १६७ सें.मी. (अजच्या उमेदवारांसाठी १६० सें.मी.); छाती ८०-८५ सें.मी. (अज- ७६-८१ सें.मी.); वजन उंची आणि वय यांच्या प्रमाणात दृष्टी जवळची दृष्टी चांगला डोळा N6, खराब डोळा N6; चष्म्याशिवाय दूरची दृष्टी – चांगला डोळा – ६/६, खराब डोळा – ६/६.

वयोमर्यादा : दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी २१ ते २७ वर्षे. (कमाल वयोमर्यादित) सूट – इमाव- ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे) वेतन- पे-लेव्हल – ३ (रु.२१,७००- ६६, १००) अंदाजे वेतन दरमहा रु. ४०,०००/-.

अजा/अज/इमाव/ईडब्ल्यूएस्/माजी सैनिक यांना विहित नमुन्यातील दाखला (जो वेबसाइटवरील जाहिरातीत दिलेला आहे. सादर करणे बंधनकारक आहे. अजा/अज/ माजी सैनिक यांचा खुल्या गटासाठी विचार केला जाणार नाही. कारण त्यांनी अर्जाचे शुल्क भरलेले नसेल. इमाव व ईडब्ल्यूएस् उमेदवारांचा खुल्या गटातील जागांसाठी विचार केला जाईल.

निवड पद्धती :

(१) हाइट बार टेस्ट, (२) शारीरिक मापदंड चाचणी, (३) शारीरिक क्षमता चाचणी, (४) कागदपत्र पडताळणी, (५) ट्रेड टेस्ट, (६) लेखी परीक्षा, (७) डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME). अंतिम निवड सर्व टेस्टमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची अखिल भारतीय स्तरावर कॅटेगरीनिहाय व उमेदवारांनी दिलेल्या पदांच्या पसंतीक्रमानुसार केली जाईल. निवड प्रक्रियेच्या सर्व स्तरावरील कॉल लेटर/अँडमिट कार्ड CISF वेबसाइट https://cisfrectt.in वर अपलोड केले जातील.

लेखी परीक्षा : ऑब्जेक्टिव्ह टाइप OMR based/ कॉम्प्युटर बेस्ड (CBT) पद्धतीची असेल. लेखी परीक्षेचा पेपर १०० प्रश्न १०० गुणांसाठी, वेळ २ तास. पेपर हिंदी/इंग्रजी भाषेत असेल. ज्यात (१) जनरल अवेअरनेस/जनरल नॉलेज, (२) प्राथमिक गणित, (३) अँनालिटिकल अँप्टिट्यूड, (४) बुद्धिमत्ता चाचणी (ability to observe and distinguish patterns) आणि (५) इंग्लिश / हिंदी भाषेचे प्राथमिक ज्ञान यावर आधारित ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न असतील.

शारीरिक मापदंड चाचणी (PST) : हाइट बार टेस्टमधून पात्र ठरलेले उमेदवार शारीरिक मापदंड चाचणी देतील. PST मध्ये -अपात्र ठरलेले उमेदवार प्रीसायडिंग ऑफिसर (PO) मार्फत अपिलेट अँथॉरिटीकडे त्याच दिवशी अपील करू शकतात.

शारीरिक क्षमता चाचणी (PET) : (१) ८०० मीटर अंतर ३ मिनिटे १५ सेकंदांत धावणे. (२) लांब उडी – ११ फूट (३ संधीमध्ये). (३) उंच उडी – ३ फूट ६ इंच (३ संधींमध्ये). PET फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

ट्रेड टेस्ट: PST, PET आणि कागदपत्र पडताळणीतून पात्र ठरलेले उमेदवार ट्रेड टेस्ट देतील. (१) ड्रायव्हिंग टेस्ट (हलके वाहन) – ५० गुण, (२) अवजड वाहन ड्रायव्हिंग टेस्ट – ५० गुण, (३) मोटर मेकॅनिझमचे प्रॅक्टिकल ज्ञान आणि वाहनाच्या लहान दुरुस्ती करता येणे (minor repair of vehicles) – ३० गुण. प्रत्येक टेस्टमध्ये किमान ५० गुण मिळविणारे उमेदवार ट्रेड टेस्टमधून पात्र ठरतील.

डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन (DME) : लेखी परीक्षेतील पात्र उमेदवार गुणवत्तेनुसार DME साठी बोलाविले जातील. DME मध्ये अपात्र ठरलेले उमेदवार रियू मेडिकल एक्झामिनेशन (RME) साठी २४ तासांच्या आत अर्ज करू शकतात.

अर्जाचे शुल्क : रु. १००/- (अजा/ अज/महिला/माजी सैनिक यांना फी माफ आहे.)

अर्ज कसा करावा

https://cisfrectt.in या वेबसाइटवर उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन फॉर्म भरणे आवश्यक. (One time registration) या विषयीची सविस्तर सूचना उक्रा च्या वेबसाइटवरील जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. पासपोर्ट साईज रंगीत फोटोग्राफ (३.५ सें.मी. रुंदी x ४.५ सें.मी. उंची) वर फोटो काढल्याचा दिनांक प्रिंट केलेला असावा. ( JPEG Format, 20KB to 50 KB मध्ये स्कॅन करून इमेज अर्जासोबत अपलोड करावी.) फोटोग्राफ जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापूर्वी तीन महिन्यांच्या आत काढलेला असावा.

अर्जासोबत JPEG Format (10 to 20 KB) मधील स्कॅण्ड सिग्नेचर (स्वाक्षरी) (४ सें.मी. x २ सें.मी. उंची इमेज डायमेंशन असावे.) आणि इतर आवश्यक कागदपत्रे PDF Format (not more than 01 MB) स्कॅन करून अपलोड करावीत. (जसे की, जन्म तारखेचा दाखला किंवा १० वीचे प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, जातीचा दाखला इ.)

ऑनलाइन अर्ज दिनांक २२ फेब्रुवारी २०२३ (२३.०० वाजे) पर्यंत स्वीकारले. जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *