L&T Construction कंपनीमध्ये कार्यक्षम Construction Technology Manager बनण्याची संधी.

‘L & T Build India Scholarship’ मिळवून आपले करिअर घडविण्याची सुवर्णसंधी. एल अँण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कार्यक्षम कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मॅनेजर बनण्याची संधी.

L & T बिल्ड इंडिया स्कॉलरशिप २०२३ प्रोग्रामचे नाव ‘M. Tech. in Consturction Technology & Management through’ L & TBuild India Scholarship. IIT मद्रास/ IIT दिल्ली/ NIT सुरथकल/ NIT त्रिचीमध्ये पूर्ण वेळ दोन वर्षांच्या M. Tech. (कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट) पदवी कोर्ससाठी प्रवेश.

कोर्स एल अँण्ड टी कन्स्ट्रक्शन • कंपनीकडून स्पॉन्सर्ड केला जाईल, कोर्सची फी एल अँण्ड टी कंपनीकडून भरली जाईल. उमेदवारांना हॉस्टेल फी आणि मेस फी स्वतः भरावी लागेल. प्रोग्रामदरम्यान उमेदवारांना दरमहा रुपये १३,४००/- स्टायपेंड दिला जाईल.

कोर्सदरम्यान उमेदवारांना एल अँण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोजेक्ट साइट्सवर प्रत्यक्ष प्रोजेक्ट करण्याची संधी. यासाठी ‘L & T बिल्ड इंडिया स्कॉलरशिप’च्या यशस्वी माजी विद्याथ्र्यांकडून मार्गदर्शन मिळेल. कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना एल अँण्ड टी कन्स्ट्रक्शनमध्ये किमान पाच वर्षे काम करावे लागेल.

पात्रता : बी.ई./बी.टेक (कोअर सिव्हिल इंजिनीअरिंग आणि कोअर इलेक्ट्रिकल (EEE alone) इंजिनीअरिंग) च्या अंतिम वर्षाचे उमेदवार ज्यांचा निकाल जून-ऑगस्ट २०२३ पर्यंत लागणार आहे. इतर इंजिनीअरिंग डिसिप्लीनचे विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र नाहीत. ज्या उमेदवारांनी २०२२ किंवा त्यापूर्वी पदवी उत्तीर्ण केलेली आहे, असे उमेदवार पात्र नाहीत.

निवड पद्धती : दि. १९ मार्च २०२३ रोजी लेखी परीक्षा घेतली जाईल. एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान इंटरव्यू घेतले जातील. यातून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मे/जून २०२३ मध्ये स्कॉलरशिप लेटर प्रदान केले जातील.

शंकासमाधानासाठी BIS@LNTECC.COMवर संपर्क साधा.

अर्ज कसा करावा : ऑनलाइन अर्ज www.intecc.com या संकेतस्थळावर • careers लिंकमधून ‘ Apply for BuildIndia Scholarship 2023 वर क्लिक करून करून दि. २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत करावा.

रजिस्ट्रेशननंतर अँप्लिकेशन फॉर्म तुमच्या ई-मेलवर पाठविलेले लॉगइन/पासवर्ड वापरून भरावा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करावा. ज्याची पोहोच तुम्हाला ई-मेलने पाठविली जाईल. तुम्हाला मिळालेला Unique ID किंवा अँप्लिकेशन नंबर नोंद करून जपून ठेवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *